वाझे यांची चौकशी मनसुख हिरेन केस बाबतच नाही तर याआधीच्या त्यांनी हाताळलेल्या केस बाबतही पुन्हा चौकशी व्हावी, अशी मागणी राणे यांनी केली.
मुंबई, दि. १४ मार्च : स्फोटकांनी भरलेल्या कार प्रकरणी पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणावरून भाजपने आक्रमक भूमिका घेत महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. दुसरीकडे, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी भाजपचे नेते नारायण राणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे.राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली आहे. शाह यांना मी पत्र पाठवून मी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत माहिती दिली. ठाकरे सरकार राज्यातील परिस्थिती हाताळण्यास अपयशी ठरत असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्यासंदर्भात मी मागणी केली आहे. तीन दिवसांपूर्वी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याबाबत मी शाह यांना पत्र लिहिले आहे’, असे त्यांनी सांगितले. ’दिशा सालियन, सुशांतसिंह राजपूत या केसेस सचिन वाझे यांनी हाताळल्या. वाझे यांना या केसेस कुणाला तरी वाचवण्यासाठी देण्यात आल्या होत्या, असा आरोप करण्यात आला ़आहे. आता वाझे यांना अटक केली आहे. वाझे यांची चौकशी मनसुख हिरेन केस बाबतच नाही तर याआधीच्या त्यांनी हाताळलेल्या केस बाबतही पुन्हा चौकशी व्हावी, अशी मागणी राणे यांनी केली. गँगस्टर रवी पुजारी आणि वाझे यांचा काय संबंध आहेत, हे मला माहीत नाही; पण पुजारी याने स्वत:हून मला स्टेटमेंट द्यायचेय असे म्हटले आहे. त्यामुळे रवी पुजारीच्या स्टेटमेंटवरुन चौकशी झाली पाहिजे. अजून कुणाच्या हत्या झाल्या आहेत का, याची चौकशी व्हावी, असे राणे म्हणाले. ’शिवसेनेचा आसरा वाझे यांना आहे. वाझे यांच्या जीवावरच तर शिवसेनेवेकडून धमक्या दिल्या जातात. वाझे यांची ज्याअर्थी मुंबईत पोस्टिंग होत होती, ते बघता वाझे यांचे पोलिस खात्यातील गॉडफादरही आता बाहेर येत आहे’, अशी टीका त्यांनी शिवसेनेवर केली.’सध्या मातोश्रीची बाजू घ्यायला बघणार्यांना पदरात पडेल, असे वाटते. त्यामुळे म्हणून संजय राऊत यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही. राष्ट्रवादी, काँग्रेसचीही वाझे प्रकरणात नैतिक जबाबदारी आहे’, अशी टीकाही राणे यांनी केली.थापा मारणारा पेपर’कसला आला आहे सामना. रमेश किणी प्रकरण आणि मनसुख हिरेन प्रकरण काय संबंध आहे. काहीही उकरुन काढतात. तो काय पेपर आहे. थापा मारणारा पेपर आहे’, असा टोला राणे यांनी सामनाच्या अग्रलेखवरून शिवसेनेला लगावला.