राज ठाकरे यांची भूमिका दर पंधरा दिवसाला बदलत असते. त्यामुळे त्याबाबत आश्चर्य वाटण्यासारखं काहीही नाही.
मुंबई, दि. २६ : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात आगामी विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली. मनसे सत्तेत आली पाहिजे, यासाठी आपण २२५ ते २५० जागा लढवायच्या आहेत, अशी घोषणाच त्यांनी केली. त्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. राज ठाकरे यांची भूमिका दर पंधरा दिवसाला बदलत असते. त्यामुळे त्याबाबत आश्चर्य वाटण्यासारखं काहीही नाही. लोकसभा निवडणुकीत त्यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. आता विधानसभा निवडणुकीमध्येही त्यांची आणखी काही वेगळी भूमिका असेल. अभिनेते कसे त्यांची भूमिका चित्रपटानुसार बदल असतात. तसं राज ठाकरे अभिनेते आहेत”, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला.