बदलापुरातील शाळेत घडलेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.
बदलापूर, दि. २० : बदलापूरमधील एका शाळेत १३ ऑगस्ट रोजी दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांनी दिरंगाई केल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला. बदलापूर रेल्वे स्थानकामध्येही रेल्वे रोको आंदोलन केलं. जवळपास गेल्या ९ तासापांसून हे आंदोलन सुरु होतं. त्यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महायुतीवर टीका केली आहे. बदलापुरातील शाळेत घडलेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. तसेच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे. आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राकडे पाहण्यासाठी वेळ नाही”, अशी खोचक टीका त्यांनी केली.