प्रत्येक मंदिरात जाऊन पाया पडायला लागलेत. पण हे हात जोडणंदेखील खोटं आहे.
मुंबई, दि. १२ : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असून महाराष्ट्रात यंदा अनेक ठिकाणी तिहेरी लढाई पहायला मिळणार आहे. महायुती, महाविकास आघाडी आणि मनसे असे तीन पक्ष प्रामुख्यने लढणार आहेत. त्यातच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गोरेगाव येथील जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात महाराष्ट्रातील जनतेला मोठं आवाहन केलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज गोरेगाव येथे जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले, “सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणायचा, देशाला दिशा देणारा महाराष्ट्र म्हणायचा, ही दिशा? याला दशा म्हणतात. मी ठाण्यातील सभेत म्हटलं होतं की शरद पवार नास्तिक आहेत. देवधर्म काही पाळत नाहीत. आजपर्यंत पाळला नाही. त्यांच्या मुलीने लोकसभेतच सांगितलं आहे, की माझेवडील नास्तिक आहेत म्हणून. मी हे सर्व बाहेर बोलल्यानंतर पवार साहेब आता प्रत्येक मंदिरात जाऊन पाया पडायला लागलेत. पण हे हात जोडणंदेखील खोटं आहे.”