IMG-LOGO
क्रीडा

कुस्तीच्या फायनलमध्ये पोहोचलेली विनेश फोगाट अपात्र

Wednesday, Aug 07
IMG

विनेश फोगाटचं वजन अवघ 100 ग्रॅम वजन जास्त भरल्याने तिला अपात्र घोषित करण्यात आलं आहे.

नवी दिल्ली, दि. ७  :  पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला मोठा धक्का बसला आहे. कुस्तीच्या फायनलमध्ये पोहोचलेल्या विनेश फोगाट हिला अपात्र ठरवण्यात आलं आहे. 50 किलो वजनी गटात खेळणाऱ्या विनेश फोगाटचं वजन अवघ 100 ग्रॅम वजन जास्त भरल्याने तिला अपात्र घोषित करण्यात आलं आहे. त्यामुळे विनेश कोणताच सामना खेळू शकणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत विनेश फोगाटला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. विनेश तू चॅम्पियन आहेस. तू भारताचा अभिमान आहेस आणि प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणा आहेस. आव्हाने स्वीकारणे हा तुमचा नेहमीच स्वभाव राहिला आहे. अशी एक्स पोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. 

Share: