IMG-LOGO
क्रीडा

महेंद्रसिंग धोनीसाठी मोदींचे खास पत्र, व्यक्त केल्या भावना

Thursday, Aug 20
IMG

आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धोनीला एक पत्र लिहीत त्याचा गौरव केला आहे.

दिल्ली, दि. २० ऑगस्ट : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने 15 ऑगस्टला अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर देशभरातून धोनीसाठी शुभेच्छाचा वर्षाव झाला. धोनीचे चाहते,कलाकार, तसेच राजकिय नेत्यांनीही धोनीच्या कामगिरी बद्दल त्याचे आभार मानले. त्यातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एक खास पत्र लिहून धोनीचे कौतुक केले आणि त्याला त्याच्या भावी वाटचाली बद्दल शुभेच्छा दिल्या. त्यानंतर धोनीने स्वतः ट्विट करता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धोनीला एक पत्र लिहीत त्याचा गौरव केला आहे, ते लिहतात, '१५ ऑगस्ट रोजी तू तुझ्या ट्रेडमार्क स्टाइलमध्ये एक लहान व्हिडिओ शेअर केला आणि त्यावरुन देशभरामध्ये चर्चा सुरु झाली. १३० कोटी भारतीय निराश झाले मात्र त्याचवेळी ते तुझे आभारीही आहेत. मागील दीड दशकामध्ये तू भारतीय क्रिकेटसाठी दिलेल्या योगदानाबद्दल ते सर्व तुझे आभारी आहेत,''तुझ्या क्रिकेटमधील करिअरकडे आकडेवारीच्या दृष्टीकोनातूनही पाहता येईल. तू भारतीय क्रिकेटला लाभलेल्या सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक आहेस. जागतिक पातळीवर भारतीय क्रिकेटला शुक्रवार पोहचवण्यामध्ये तुझं अतुलनीय योगदान आहे. क्रिकेटच्या इतिहासामध्ये तुझं नाव कायमच एक यशस्वी फलंदाज, यशस्वी कर्णधार आणि जगातील सर्वोत्तम यष्टीरक्षक म्हणून घेतलं जाईल.'या पत्रामध्ये पंतप्रधानांनी २०११ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्याच्या आठवणी जाग्या करताना, 'कठीण प्रसंगी संघाला तारण्यात आणि तुझ्या स्पेशल स्टाईलमध्ये मॅच संपवण्यात तू माहीर होतास. येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी तुझी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील खेळी संस्मरणीय राहील.'

Share: