IMG-LOGO
महाराष्ट्र

पेट्रोल, डिझेलबरोबरच गॅस भडकला

Monday, Mar 01
IMG

फेब्रुवारी महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती तीनदा वाढवण्यात आल्या आहेत. सरकारने चार फेब्रुवारी रोजी गॅस सिलेंडरच्या किमतींमध्ये 25 रुपयांची वाढ केली होती.

मुंबई, दि. १ मार्च : पेट्रोल आणि डीझेलच्या किमती वाढत असतानाच सामान्य नागरिकांच्या खिशाला आता गॅसनेसुद्धा कात्री लावली. सरकारी तेल कंपन्यांनी आजपासून गॅसच्या किमतींमध्ये 25 रुपयांची वाढ केली आहे. दिल्लीत आता विनाअनुदानित सिलेंडर 819 रुपयांत मिळत आहे. आधी याची किंमत 794 रुपये एवढी होती. 2021 मध्ये सुरुवातीच्या दोन महिन्यांतच घरगुती सिलेंडरच्या किमतींमध्ये तब्बल 125 रुपयांची वाढ झाली आहे. एक जानेवारी रोजी जे सिलेंडर 694 रुपयांना मिळत होते, ते आता 819 रुपयांवर पोहोचले आहे. फेब्रुवारी महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती तीनदा वाढवण्यात आल्या आहेत. सरकारने चार फेब्रुवारी रोजी गॅस सिलेंडरच्या किमतींमध्ये 25 रुपयांची वाढ केली होती. त्यानंतर 15 फेब्रुवारी रोजी त्यात 50 रुपयांची आणि 25 फेब्रुवारी रोजी पुन्हा 25 रुपयांची वाढ केली. अर्थात एका महिन्यातच सिलेंडरचे भाव शंभर रुपयांनी वाढवण्यात आले. एक डिसेंबर 2020 रोजी गॅस सिलेंडरची किंमत 594 रुपयांवरून 644 करण्यात आली. एक जानेवारी रोजी त्यात पुन्हा 50 रुपयांची वाढ करण्यात आली. त्यामुळे घरगुती स्वयंपाकाचे सिलेंडर 694 रुपयांत येत होते. मग फेब्रुवारी महिन्यात तीनदा एकूण शंभर रुपये वाढवण्यात आले. अशा प्रकारे 25 फेब्रुवारी रोजीच गॅस सिलेंडरची किंमत 794 रुपये झाली. आता एक मार्चपासून आणखी 25 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 19 किलोच्या वाणिण्य वापराच्या सिलेंडरच्या किमतीसुद्धा 90.50 रुपयांनी महागल्या आहेत. दिल्लीत आता कमर्शिअल सिलेंडरची किंमत 1614 रुपये तर मुंबईत 1563.50 रुपये करण्यात आली आहे.

Share: