IMG-LOGO
महाराष्ट्र

राहुल गांधी दोन दिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करणार

Wednesday, Oct 02
IMG

विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते व आमदार सतेज पाटील यांनी माहिती दिली.

कोल्हापूर, दि. २ :   लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी येत्या शुक्रवारी व शनिवारी (४ व ५ ऑक्टोबर रोजी) कोल्हापूर दौऱ्यावर जाणार आहेत. खासदार राहुल गांधी यांच्या हस्ते कोल्हापूरमधील कसबा बावडा येथील भगवा चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होणार असून शनिवारी होणाऱ्या संविधान सन्मान संमेलनाला ते उपस्थित राहणार असल्याची माहिती विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते व आमदार सतेज पाटील यांनी दिली.४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन आणि कसबा बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणासाठी कार्यक्रम स्थळी कडे प्रस्थान, प्रवासाचा मार्ग : कोल्हापूर विमानतळ – शाहू नाका – शिवाजी विद्यापीठ – कावळा नाका – धैर्यप्रसाद चौक – पोलीस उपअधीक्षकांचं कार्याल – भगवा चौक, कसबा बावडा. सायंकाळी ६ वाजता – कसबा बावडा येथील समारंभ संपल्यानंतर हॉटेल सयाजीकडे प्रयाण आणि मुक्काम असा त्यांचा दौरा असणार आहे. 

Share: