IMG-LOGO
महाराष्ट्र

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची बाबा सिद्दीकी गोळीबार प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया...

Sunday, Oct 13
IMG

उज्ज्वल परंपरा असलेल्या या प्रदेशात तुम्हाला उद्ध्वस्त करायचं आहे.

मुंबई, दि. १३  :  अजित पवार गटाचे नेते व माजी आमदार बाबा सिद्दीकी यांचा गोळीबारात मृत्यू झाला आहे.  मुंबईतील वांद्र पूर्व परिसरातील खेरनगरमधील राम मंदिर परिसरात घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. गोळीबारानंतर बाबा सिद्दीकी यांना तातडीने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तेथे त्यांना मृत घोषित केले. यावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निषेध केला आहे. राज ठाकरे  म्हणाले,  उज्ज्वल परंपरा असलेल्या या प्रदेशात तुम्हाला उद्ध्वस्त करायचं आहे. सर्वांचे महाराष्ट्राकडे डोळे लागले आहेत. कोण येतंय, कोण जातंय कोणाला काही थांगपत्ताच नाही”, असं राज ठाकरे म्हणाले. ते पुढे म्हणाले, “काल सिद्दिकी यांचा खून झाला. खून करणारी माणसं कोण? एक युपीचा आणि एक हरियाणाचा. बाहेरच्या राज्यातून लोक येतात, पोलिसांच्या देखत, इतक्या लोकांसमोर खून होत आहेत. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात मुलींवर लैंगिक अत्याचाराची आकडेवारीही वाचून दाखवली. “हा समृद्ध महाराष्ट्र? बाईबद्दल काही गोष्ट घडली की तर चौरंग करणारा आमचा शिवराय, ती धाक, भीती होती, ती कुठेय राज्यात? ही जर महिलांची परिस्थिती असेल, लहान मुलींची परिस्थिती असेल तर कोणत्या शाळेत पाठवायचं? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Share: