IMG-LOGO
महाराष्ट्र

इक्बालसिंह चहल यांची तडकाफडकी बदली; आता गृहखात्यात मिळाली मोठी जबाबदारी

Thursday, Aug 22
IMG

इक्बालसिंह चहल सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम पाहत होते.

मुंबई, दि. २२ : मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अतिरिक्त सचिव इक्बालसिंह चहल (Iqbal singh chahal) यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. इक्बालसिंह चहल यांच्याकडे आता गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. इक्बालसिंह चहल सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम पाहत होते. आता त्यांच्याकडे गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव या पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याचबरोबर अपर मुख्य सचिव (खनिकर्म), उद्योग, ऊर्जा व खनिकर्म विभाग या पदाचा अतिरिक्त कार्यभारही चहल यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

Share: