IMG-LOGO
महाराष्ट्र

माझ्या अटकेमागे अजित पवार : काकडे

Friday, May 07
IMG

काकडे यांची नुकतीच भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

पुणे, दि. ७ मे : मी 35 वर्षे जमिनीचे व्यवहार करतो. एकही प्रॉपर्टीची केस नाही. सहा वर्षांत कोणावर अन्याय केला असेल तरी सांगावे; मात्र गजानन मारणे प्रकरणात वापरण्यात आलेली गाडी राष्ट्रवादी काँग्रेसशी निगडित असूनदेखील मला अटक करून चौकशी करण्यात आली. पालकमंत्र्यांशिवाय अटक होऊ शकत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असतो तर मला अटक झाली नसती, असा गौप्यस्फोट भाजपचे उपाध्यक्ष संजय काकडे यांनी केला आहे. काकडे यांची नुकतीच भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. काकडे म्हणाले, की मुख्यमंत्री मुंबईचा, उपमुख्यमंत्री पुण्याचा; परंतु याच ठिकाणी सर्वांत जास्त कोरोना रुग्ण आहेत. याचाच अर्थ परिस्थिती नियंत्रणात नाही. काही झाले की केंद्र सरकारवर ढकलून मोकळे व्हायचे. एवढेच काम राज्य सरकार करत आहे. आरक्षणाबाबतीत तेच, काय चालले आहे, तेच राज्यात कळत नाही. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला; मात्र राज्य सरकार म्हणून यापुढे तुम्ही काय करणार याचे उत्तर दिले पाहिजे. मुंबई, पुण्यातील सर्व नागरिकांना लस द्यायला हवी. जेणेकरून सर्व उदयोग व्यवस्थित सुरू होतील. राज्य सरकारने नियोजन केले पाहिजे. या सरकारमध्ये ताळमेळ राहिलेला नाही. सगळ्या गोष्टी केंद्रावर ढकलून कसे चालेल. आपले राज्य मोठे आहे. इथे मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे आहेत. त्यामुळे कोरोना आटोक्यात आणला पाहिजे. राजकारण करायला बाकी सर्व आयुष्य पडले आहे, असेही काकडे यांनी या वेळी सांगितले.

Share: