माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांचे नुकसान होईल, म्हणून तसे करणे टाळत आहेत.
बारामती, दि. २ : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षांच्या उमेदवारांना आर्थिक मदत करण्यासाठी पोलिसांच्या वाहनांचा वापर केला जात असल्याचा आरोप पवार यांनी केला आहे. बारामतीत पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले की, मला या विषयावर अधिक बोलायचे आहे. परंतु, यामुळे माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांचे नुकसान होईल, म्हणून तसे करणे टाळत आहेत.शिंदे गटाकडून नाशिकच्या उमेदवारांना विमानाने एबी फॉर्म पाठवण्यात आल्यानंतर शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. शरद पवार म्हणाले की, 'आम्ही अनेक जिल्ह्यांमधून ऐकत आहोत, काही अधिकाऱ्यांकडून ऐकत आहोत की, सत्ताधारी पक्षातील उमेदवारांपर्यंत पैसे पोहोचवण्यासाठी पोलीस वाहनांचा वापर केला जात आहे. हे मी जाहीरपणे सांगणार होतो. परंतु, माहिती देण्याऱ्या अधिकाऱ्याने नाव जाहीर करू नये, अशी गळ घातली आहे.' दरम्यान, याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार का? असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, 'याबाबत माझ्याकडे अधिकृत माहिती असती तर मी वाटेल ते केले असते. परंतु, मी पूर्ण माहितीशिवाय भाष्य करत नाही.'शरद पवारांनी आर. आर. पाटील यांच्याबाबत अजित पवारांनी केलेल्या विधानाचा आज निषेध केला. अजित पवारांनी सिंचन घोटाळ्याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते व माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचं नाव घेत टीका केली होती. आज शरद पवारांनी घेतलेल्या पत्रकार परिदेत प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी अजित पवारांच्या विधानाबाबत विचारणा केली असता त्यावर शरद पवारांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला.