कथेत पुढे जाण्यासाठी पानं उलटावी लागतात असं म्हणतात, म्हणून मीही तेच करणार आहे.
मुंबई, दि. २५ : टीम इंडियाचा डावखुरा सलामीवीर आणि २०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या संघाचा एक भाग असलेल्या शिखर धवनने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली. धवनने २४ ऑगस्ट रोजी सकाळी एक्सवर एक व्हिडीओ शेअर करुन याबाबत माहिती दिली. व्हिडिओ पोस्ट करताना शिखर धवनने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मी आता माझ्या क्रिकेट प्रवासाचा हा अध्याय संपवत आहे. मी माझ्या सोबत असंख्य आठवणी घेऊन जात आहे. आपल्या सर्वांच्या प्रेमासाठी आणि समर्थनासाठी धन्यवाद! जय हिंद!’ शिखर धवनने पोस्ट मध्ये म्हटले, सर्वप्रथम माझे कुटुंब, माझे बालपणीचे प्रशिक्षक तारक सिन्हा जी आणि मदन शर्मा जी यांच्या मार्गदर्शनाखाली मी क्रिकेट शिकलो. मग माझी टीम ज्यांच्यासोबत मी वर्षानुवर्षे खेळलो जिथे मला माझे कुटुंब मिळाले आणि तुम्हा लोकांचे समर्थन आणि प्रेम मिळाले. कथेत पुढे जाण्यासाठी पानं उलटावी लागतात असं म्हणतात, म्हणून मीही तेच करणार आहे. मी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत आहे. आज माझ्या क्रिकेट प्रवासाला निरोप देताना देशासाठी खेळलो याचा मला अभिमान आहे. मला ही संधी दिल्याबद्दल मी बीसीसीआय आणि डीडीसीएचे आभार मानू इच्छितो आणि माझ्यावर खूप प्रेम करणाऱ्या माझ्या सर्व चाहत्यांचे आभार मानू इच्छितो.” असे त्याने व्हिडीओ संदेशात म्हटले आहे.