महाविकास आघाडी स्थापन करण्याच्या निर्णयाला याच्याशी जोडलं जात आहे.
मुंबई, दि. २१ : दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या बायोपिकचा सिक्वेल असलेला 'धर्मवीर 2' हा चित्रपट 9 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रविण तरडे यांनी या चित्रपटाची कथा, दिग्दर्शन केलं आहे. तर मंगेश देसाई आणि उमेश बन्सल यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर हा चित्रपट प्रदर्शित होत असल्याने चित्रपटाचं टायमिंगही चर्चेत आहे. "आपल्या संघटनेचा माज आहे हा भगवा रंग. सनातन हिंदू धर्माचा संस्कार आहे हा भगवा रंग. छत्रपती शिवरायांचं स्वप्न होता हा भगवा रंग. आणि कुणाशी तरी आघाडी करुन तुम्ही विकलात हा भगवा रंग...", धर्मवीर सिनेमातील हा दमदार डायलॉग प्रेक्षकांच्या पसंतील उतरताना दिसत आहे. मात्र या डायलॉगचे वेगवेगळे राजकीय अर्थ देखील काढले जात आहेत. महाविकास आघाडी स्थापन करण्याच्या निर्णयाला याच्याशी जोडलं जात आहे. यावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.