कुणाल कामरा याने अर्णब गोस्वामी यांना जामीन दिल्यानंतर एक ट्विट केले होते. त्यावर आक्षेप घेण्यात आला होता.
नवी दिल्ली, दि. १८ डिसेंबर : स्टॅंडअप कॉमेडियन कुणाल कामरा आणि व्यंगचित्रकार रचिता तनेजा यांच्या बाबतीत न्यायालय आणखी कठोर झाल्याचं पाहायला मिळत आहे. न्यायालयाचाच अवमान केल्याप्रकरणी कुणाल कामरा आणि रचिता तनेया यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यांच्याविरोधातील कारवाई आणि हे प्रकरण का हाताळलं जाऊ नये, यासाठी त्यांना उत्तर देण्यासाठी सहा आठवड्यांचा वेळही देण्यात आला आहे.कुणाल कामरा याने अर्णब गोस्वामी यांना जामीन दिल्यानंतर एक ट्विट केले होते. त्यावर आक्षेप घेण्यात आला होता. तर रचिता तनेजाने काढलेल्या व्यंगचित्रातून न्यायालयाचा अवमान झाल्याचे सांगत अवमान खटला चालवण्याची मागणी करण्यात आली होती.दोघांविरुद्ध अवमान खटला चालवण्यास ऍटर्नी जनरल के. वेणुगोपाल यांनी परवानगी दिली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दोघांनाही कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. दोघांनाही सहा आठवड्यात उत्तर सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.कुणाल कामराने रिपब्लिक वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिल्यानंतर न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्यावर टीका करणार ट्विट केले होते. अर्णब गोस्वामीच्या जामीनाला विरोध करत कामराने सर्वोच्च न्यायालयावर टीका केली होती.