प्रत्यक्षदर्शींनी संकेत बावनकुळे आणि इतरांना पकडून चोप दिला, असा दावा सुषमा अंधारे यांनी केला.
नागपूर, दि. १० : रविवारी मध्यरात्री नागपूरच्या सीताबर्डी भागात एका ऑडी कारनं काही वाहनांना धडक दिली. यामध्ये कुणीही गंभीर जखमी झालेलं नाही. मात्र, वाहनांचं नुकसान झालेलं आहे. नागपूर ‘हिट अँड रन’ रन प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहेत. सेंट्रल पॉईट हॉटेलसमोर त्यांनी एका कारला धडक दिली. ती धडक एवढी भयंकर होती की ऑडी कारचाही समोरचा भाग चक्काचूर झाला तर धडक बसलेल्या कारचे मोठे नुकसान झाले. या अपघाताचा सर्व थरार दर्शवणारे सीसीटीव्ही समोर आले आहे. सुषमा अंधारे यांनीही संकेत बावनकुळेच मद्यप्राशन करून कार चालवित असल्याचा आरोप केला होता तर संजय राऊत यांनीही संकेत बावनकुळेला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका केली आहे. यावेळी प्रत्यक्षदर्शींनी संकेत बावनकुळे आणि इतरांना पकडून चोप दिला, असा दावा सुषमा अंधारे यांनी केला. पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी प्रसारमाध्यमांना सांगितल्यानंतर याविषयी अनेक नवनवीन खुलासे समोर येत आहेत. आज शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांन सीताबर्डी पोलीस ठाणे गाठून पोलिसांना अनेक प्रश्न विचारले. तसेच संकेत बावनकुळे गाडीत उपस्थित असतानाही त्याची वैद्यकीय तपासणी का झाली नाही? त्याचे नाव एफआयआरमध्ये का नाही? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. रविवारी मध्यरात्री मानकापूर मार्गे कोराडीला जात असताना वाटेत का वाहनांना संकेत बावनकुळे बसलेल्या कारने धडक दिली. प्रत्यक्षदर्शींनी चोप दिल्यानंतर आरोपींना पोलीस ठाण्यात आणण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र त्यातून वाचण्यासाठी संकेत बावनकुळे वाहनासह पळून गेला. त्यामुळे रामदास पेठेत आणखी तीन वाहनांना धडक दिली गेली. या तीन वाहनांपैकी एक वाहन नागपूर प्रेस क्लबचे कर्मचारी जितेंद्र सोनकांबळे यांची होती. जितेंद्र सोनकांबळे यांनी रात्रीच एफआयआर दाखल करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी तक्रार घेतली नाही, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला.