सहकारी ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर मात्र ११व्या स्थानावर राहिल्याने त्याला आव्हान गमवावे लागले.
नवी दिल्ली, दि. १ : पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या आणखी एका नेमबाजाने बुधवारी अंतिम फेरी गाठली. महाराष्ट्राच्या स्वप्निल कुसळेने ५० मीटर रायफल थ्री-पोझिशन प्रकारात पात्रता फेरीत सातवे स्थान पटकावत ही कामगिरी केली. त्याचा सहकारी ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर मात्र ११व्या स्थानावर राहिल्याने त्याला आव्हान गमवावे लागले.स्वप्निलने एकूण ५९० गुणांची कमाई केली. स्पर्धा प्रकारातील पहिल्या गुडघे टेकण्याच्या स्थितीतून स्वप्निलने १९८ (९९,९९) गुणांची कमाई केली. त्यानंतर प्रोन पद्धतीत १९७ (९८, ९९) आणि उभे राहून १९५ (९८, ९७) गुणांची कमाई केली. त्याच वेळी सहकारी तोमर अनुक्रमे १९७, १९९ आणि १९३ गुणांसह ५८९ गुण मिळवून ११व्या स्थानावर राहिला. या स्पर्धा प्रकाराची अंतिम फेरी गुरुवारी होणार आहे.