ऐवज लुटल्यानंतर दरोडेखोरांनी दाम्पत्याचे मोबाईल खाली गेटजवळ ठेवून पोबारा केला.
जळगाव, दि. ३ फेब्रुवारी : शहरातील मोहाडी रोड परिसरात दौलतनगर येथे सहा जणांनी बुधवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घरात घुसून, चाकूचा धाक दाखवून तीन लाख रुपये रोख आणि 20 लाखांचे दागिने असा एकूण 23 लाखांचा ऐवज लुटून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ऐवज लुटल्यानंतर दरोडेखोरांनी दाम्पत्याचे मोबाईल खाली गेटजवळ ठेवून पोबारा केला.