IMG-LOGO
महाराष्ट्र

पुण्याहून मुंबईकडे निघालेले हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू

Wednesday, Oct 02
IMG

दरीत हे हेलिकॉप्टर कोसळले. आहे. या घटनेत तिघे जण ठार झाल्याची माहिती आहे.

पुणे, दि. २ :   पुण्यात बावधन बुद्रुक गावाजवळ बुधवारी सकाळी हेलिकॉप्टर कोसळले. या घटनेची माहिती स्थानिकांनी हिंजवडी पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. या अपघातात तीन जण ठार झाल्याची माहिती आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या तीन गाड्या रवाना झाल्या असून बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. मृतांमध्ये दोन पायलट आणि एक इंजिनियर असल्याची प्राथमिक माहिती आहे. हेलिकॉप्टरणने उड्डाण केल्यानंतर ते मुंबईतील जुहूला निघाले होते. मात्र, उड्डाण केल्यानंतर काहीवेळातच धुक्यामुळे हेलिकॉप्टर दरीत कोसळले. पुण्यातील लवळे येथील ऑक्सफर्ड येथून आज सकाळी एका ७.३० च्या सुमारास हेलिकॉप्टरने टेक ऑफ घेतले होते. मात्र, धुक्यामुळे हे हेलिकॉप्टर बावधन परिसरात एका डोंगरावर कोसळल्याची माहिती आहे. बावधन बुद्रुक व ऑक्सफर्ड आणि एच.ई.एम.आर. एल. मधील दरीत हे हेलिकॉप्टर कोसळले. आहे. या घटनेत तिघे जण ठार झाल्याची माहिती आहे. 

Share: