IMG-LOGO
महाराष्ट्र

मोदी-शाह यांचा महाराष्ट्र होऊ देणार नाही : उद्धव ठाकरे

Saturday, Oct 12
IMG

आम्ही सरकारी कर्मचाऱ्यांना जागा देऊ, असं आश्वासनही उद्धव ठाकरे यांनी दिलं.

मुंबई, दि. १२  : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा दसरा मेळावा मुंबईतील शिवतीर्थ म्हणजेच शिवाजी पार्कवर पार पडला. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.  यांचे गोमुत्रधारी बुरसटलेले हिंदुत्व नको होते म्हणून आम्ही भाजपला लाथ घातली. मिंध्यांना सांगा हे..जाहिरात दिलीय त्यांनी एक...हिंदुत्व आमचा प्राण..अदानी आमची जान व आम्ही शेटजींचे श्वान.. असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.माझ्यात जीव असेपर्यंत मी महाराष्ट्र लुटू देणार नाही. शेवटच्या श्वासपर्यंत मी हा महाराष्ट्र मी मोदी शाह यांचा महाराष्ट्र होऊ देणार नाही. हा शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र मी मोदी-शाहांच्या हातात जाऊ देणार नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. ठाण्यातील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी शिंदेला मारायलाच हवे होते. आनंद दिघे असते तर त्यांनीही हेच केलं असंत. पण भाजपाच्या लोकांना वाचवण्यासाठी त्याला गोळी मारली असेल तर त्याचा उलगडा झालाच पाहिजे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. अदाणींच्या हातात मुंबईत देत असाल तर आमचं सरकार आल्यावर आम्ही धारावीचं कंत्राट रद्द करू, आम्ही तिथे पोलिसांना जागा देऊ. वांद्रेची जागा आम्ही सरकारी कर्मचाऱ्यांना दिली होती. मात्र, शिंदेंनी ही जागा कोर्टाला दिली. आमचं सरकार आल्यावर आम्ही सरकारी कर्मचाऱ्यांना जागा देऊ, असं आश्वासनही उद्धव ठाकरे यांनी दिलं.

Share: