ही यात्रा दादर चैत्यभूमीपासून निघणार असून संभाजीनगर येथे यात्रेची सांगता होणार आहे.
अकोला, दि. १६ : येत्या २५ तारखेपासून राज्यात आरक्षण बचाव यात्रा सुरु करणार असल्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. एस सी, एस टी, ओबीसींच्या हक्काची लढाई असून याची सुरुवात दादरच्या चैत्यभूमीपासून होणार असल्याची माहिती प्रकाश आंबडेकर यांनी दिली आहे. आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकार गंभीर आहे का असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. आरक्षण बचाव यात्रा एस सी,एस टी,ओबीसींच्या हक्काची लढाई असून याची सुरुवात दादरच्या चैत्यभूमीपासून होणार असल्याची माहिती प्रकाश आंबडेकर यांनी दिली आहे.ही यात्रा दादर चैत्यभूमीपासून निघणार असून संभाजीनगर येथे यात्रेची सांगता होणार आहे.