या निकृष्ट रस्त्यांबाबत गावातील तरुण त्यांना जाब विचारतांना दिसत आहेत.
जामनेर, दि. १४ : ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. या व्हिडिओत ग्रामविकास मंत्र्यांच्या जामनेर मतदार संघातील रस्त्यांची दुसरवस्था दिसून येत आहेत. या निकृष्ट रस्त्यांबाबत गावातील तरुण त्यांना जाब विचारतांना दिसत आहेत. मात्र, गिरीश महाजन त्यांना उत्तर न देता दुचाकीवर बसून याच चिखल असलेल्या खराब रस्त्यातून जात असतांना दिसत आहेत. या घटनेवरून गावातील तरुणांनी व नागरिकांनी मंत्र्यांच्या या वागणुकीवर रोष व्यक्त केला आहे. तसेच खराब रस्त्यांबाबत देखील नाराजी व्यक्त केली आहे. येथील रस्त्यांबाबत ठोस भूमिका घेऊन निर्णय घेणे अपेक्षित असतांना ग्रामविकास मंत्री मात्र, दुचकीवर बसून निघून गेले असे तरुणांनी म्हटलं आहे. महाजन यांचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.