नाशिक, ता. 21 : नाशिकमध्ये आज 100 वर्षांच्या आजीबाईंनी मतदानाचा हक्क बजावला. सखुबाई नामदेव चुंबळे असे त्यांचे नाव आहे. 1960 पासून ते आजपर्यंत 14 विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. नाशिकव्यतिरिक्त राज्यातील अनेक भागांत मतदानाचा उत्साह दिसून आला. ज्येष्ठ, अपंगांनी आवर्जून मतदानात भाग घेतला.
नाशिक, ता. 21 : नाशिकमध्ये आज 100 वर्षांच्या आजीबाईंनी मतदानाचा हक्क बजावला. सखुबाई नामदेव चुंबळे असे त्यांचे नाव आहे. 1960 पासून ते आजपर्यंत 14 विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. नाशिकव्यतिरिक्त राज्यातील अनेक भागांत मतदानाचा उत्साह दिसून आला. ज्येष्ठ, अपंगांनी आवर्जून मतदानात भाग घेतला. राज्यातील मतदानाची ही काही निवडक छायाचित्रे. नंदुरबार जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रांवर ज्येष्ठ नागरिक आणि महिला मतदारांनी उत्साहाने केले मतदान. रावेर विधानसभा मतदार संघात महिलांद्वारे संचालित #सखी मतदान केंद्रात फ़ेटे बांधून गुलाबपुष्प देऊन मतदारांचे स्वागत करताना निवडणूक अधिकारी-कर्मचारी. नगर मध्ये सिग्नलवर मतदानाचे आवाहन करताना जबाबदार नागरिक गडेगाव तालुका लाखनी-आदर्श मतदान केंद्र विधानसभा क्षेत्र साकोली