विधानसभेच्या निवडणुकीत नाशिक जिल्ह्यातील अनेक विदयमान आणि वर्षानुवर्ष सत्ता राखलेल्यांना नाशिककरांनी घरचा रस्ता दाखवला आहे. तर काही आमदारांना आपल्या जागा राखण्यात यश आले आहे. राष्ट्रवादीच्या जिल्हयात 2 जागा वाढल्या आहेत, तर मालेगावमध्ये एमआयएमचा प्रवेश झाला आहे.
विधानसभेच्या निवडणुकीत नाशिक जिल्ह्यातील अनेक विदयमान आणि वर्षानुवर्ष सत्ता राखलेल्यांना नाशिककरांनी घरचा रस्ता दाखवला आहे. तर काही आमदारांना आपल्या जागा राखण्यात यश आले आहे. राष्ट्रवादीच्या जिल्हयात 2 जागा वाढल्या आहेत, तर मालेगावमध्ये एमआयएमचा प्रवेश झाला आहे.नाशिक शहराला लागून असलेल्या देवळाली मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या सरोज अहिरे विजयी झाल्या आहेत. गेल्या 30 वर्षांपासून सत्ता उपभोगणाऱ्या घोलप कुटुंबाचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. शिवसेनेचे आमदार व बबनराव घोलप यांचे सुपूत्र योगेश घोलप पराभूत झाले आहेत.निफाडमध्येही शिवसेनेला पराभवाच धक्का बसला आहे. शिवसेनेचे दोन वेळेस आमदार राहिलेले अनिल कदम या ठिकाणी पराभूत झाले असून राष्ट्रवादीचे दिलीप बनकर विजयी झाले आहेत.नांदगावमधून दोनदा आमदार झालेले राष्ट्रवादीचे पंकज भुजबळ यंदा हॅटट्रिकपासून दूर राहिले. याठिकाणी शिवसेनेचे सुहास कांदे विजयी झाले आहेत.कम्युनिष्टांचा गड समजल्या जाणाऱ्या कळवण-सुरगाणा मतदारसंघात वर्चस्व असलेल्या माकपाचे जे.पी. गावित यांचा पराभव झाला आहे. माजी मंत्री ए.टी. पवार यांचे सुपुत्र व राष्ट्रवादीचे उमेदवार नितीन पवार हे याठिकाणी विजयी झाले आहेत.इगतपुरीमध्ये कॉँग्रेसने गड राखला आहे. कॉँग्रेसचे हिरामण खोसकर विजयी झाले आहेत. मात्र याठिकाणी दोनदा आमदार झालेल्या निर्मला गावित यांनी ऐनवेळी कॉँग्रेस सोडून सेनेत प्रवेश केलेल्या केल्याने मतदारांनी त्यांना नाकारून घरचा रस्ता दाखविला आहे.सिन्नरमधून शिवसेनेचे विदयमान आमदार राजाभाऊ वाजे यांना पराभव पत्करावा लागला असून राष्ट्रवादीचे ॲड. माणिकराव कोकाटे याठिकाणी विजयी झाले आहेत.सटाणा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या विदयमान आमदार दीपिका चव्हाण पराभूत झाल्या आहेत, याठिकाणी मतदारांनी भाजपाच्या दिलीप बोरसे यांच्या पारड्यात विजयाचा कौल टाकला आहे.पेठ दिंडोरीतून राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ पुन्हा निवडून आले आहेत, तर मालेगाव बाह्यमधून शिवसेनेचे आमदार दादा भुसे पुन्हा विजयी झाले आहेत.चांदवड-देवळामधून भाजपाचे विदयमान आमदार डॉ. राहुल आहेर पुन्हा विजयी झाले आहेत.नाशिक शहरातून (पूर्व) मधून भाजपाने तिकीट नाकारल्याने राष्ट्रवादीत गेलेल्या विदयमान आमदार बाळासाहेब सानप यांचा पराभव करून मनसेतून भाजपात आलेल्या ॲड. राहुल ढिकले यांना मतदारांनी विजयी केले आहे.नाशिक पश्चिम आणि नाशिक मध्य मधून अनुक्रमे सीमा हिरे आणि प्रा. देवयानी फरांदे यांनी पुन्हा एकदा गड राखण्यात यश मिळविले आहे.त्याचप्रमाणे येवला मतदारसंघातून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री छगन भुजबळ पुन्हा निवडून आले आहेत.मालेगाव मध्य मधून कॉँग्रेसचे विदयमान आमदार आसिफ शेख यांचा पराभव करून एमआयएमने खाते उघडले आहे. याठिकाणी धर्मगुरू असलेले माजी आमदार मोहम्मद इस्माईल अब्दुल खालिक यांचा विजय झाला आहे.