मायक्रोआरएनए या सूक्ष्म रेणूच्या शोधाबद्दल प्रदान करण्यात आले आहे.
स्वीडन, दि. ७ : वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पारितोषिक २०२४ च्या पुरस्कारांची घोषणा आज (७ आक्टोंबर) करण्यात आली आहे. अमेरिकेचे व्हिक्टर ॲम्ब्रोस आणि गॅरी रुवकुन हे या नोबेल पारितोषिक २०२४ च्या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. मायक्रो आरएनएच्या (microRNA) शोधाबद्दल व्हिक्टर ॲम्ब्रोस आणि गॅरी रुवकुन यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. शास्त्रज्ञ व्हिक्टर ॲम्ब्रोस आणि गॅरी रुवकुन यांना या वर्षीचे नोबेल पारितोषिक हे मायक्रोआरएनए या सूक्ष्म रेणूच्या शोधाबद्दल प्रदान करण्यात आले आहे.दरम्यान, दरवर्षी प्रमाणे याही वर्षी या क्षेत्रातील नोबेल पारितोषिकाची घोषणा आधी करण्यात आली आहे. तसेच ७ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर या दरम्यान अर्थशास्त्र, साहित्य, शांतता, विज्ञान अशा क्षेत्रात उत्तम कार्य करणाऱ्या लोकांना नोबेल पारितोषिकाची घोषणा करण्यात येणार आहे. हे पुरस्कार स्टॉकहोम, स्वीडन या ठिकाणी दिले जाणार आहेत.