IMG-LOGO
विदेश

कॅनडाचे भारतावर गंभीर आरोप; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर देखील आरोप

Saturday, Nov 02
IMG

कॅनडाच्या एका सरकारी बेवसाईटवर ही यादी उपलब्ध असल्याचे म्हटले जात आहे.

नवी दिल्ली, दि. २ :  भारत-कॅनडा वादाला पुन्हा एकदा तोंड फुटले आहे. पुन्हा एकदा कॅनडाने भारतावर गंभीर आरोप केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कॅनडाची गुप्तचर संस्था कम्युनिकेशन सिक्युरिटी एस्टॅब्लिशमेंट (CSE) ने भारताचा समावेश धोकादायक देशांच्या यादीत समावेश केला आहे. गुप्तचर संस्थेने हा अहवाल 31 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केला असून या अहवालानुसार, चीन रशिया, इराण आणि उत्तर कोरिया यांच्यासोबत भारताचे नाव पाचव्या क्रमांकावर जोडलेले आहे. कॅनडाच्या एका सरकारी बेवसाईटवर ही यादी उपलब्ध असल्याचे म्हटले जात आहे.दरम्यान कॅनडाने भारताचे केंद्रीय गृहमंत्री व भारतीय जनता पक्षाचे माजी पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्यावर देखील आरोप केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कॅनडाचे गृहमंत्री डेव्हिड मॉरिसन यांनी अमित शहा यांच्यावर खलिस्तानी गटांच्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश दिल्याचा आरोप केला होता. मात्र भारताने आरोपाला तीव्र विरोध दर्शवला. तसेच त्यांनी कॅनडाकडून या आरोपाचे स्पष्टीकरण देखील मागितले आहे.

Share: