IMG-LOGO
महाराष्ट्र लोकसभा

नांदेड लोकसभा मतदारसंघाचा कॉंग्रेसचा उमेदवार ठरला !

Wednesday, Oct 16
IMG

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठीही काँग्रेसचा उमेदवार ठरला आहे. तून काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांना निवडणुकीच्या रिंगणात

मुंबई, दि. १६ : केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील नांदेड व केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघ, तसेच विधानसभेच्या ४८ जागांसाठी पोटनिवडणुकांचा कार्यक्रम मंगळवारी जाहीर केला. काँग्रेसने वायनाड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. तर नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठीही काँग्रेसचा उमेदवार ठरला आहे. वसंत चव्हाण यांच्या निधनामुळे नांदेड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. दिल्लीतील बैठकीत नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी पक्षाचा उमेदवार ठरला आहे. या मतदारसंघातून वसंत चव्हाण यांचे पुत्र रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

Share: