महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालाचा कल पुढच्या काही मिनिटांत समोर येणार आहे.
मुंबई, दि. ४ : देशातील महाउत्सव म्हणजेच लोकसभा निवडणुका पार पडल्या आहेत. आता ४ जून रोजी या लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. देशात या लोकसभा निवडणुकांच्या निकालाचा सर्वच आतुरतेने वाट पाहत आहेत. महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालाचा कल पुढच्या काही मिनिटांत समोर येणार आहे. या निवडणुकीत सर्वच नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात देशाच्या तुलनेत काहीशी वेगळी स्थिती होती, त्यामुळे महाराष्ट्रात महायुती की महाविकास आघाडी; कोणाचा होणार विजय याची उत्सुकता लागून आहे.