IMG-LOGO
महाराष्ट्र लोकसभा

Lok Sabha Election Result 2024 Maharashtra : पहिल्या फेरीअखेर पंकजा मुंडे, नारायण राणे, भारती पवार, हेमंत गोडसे, अनंत गिते, राम सातपुते पिछाडीवर, महायुतीची २२ जागांवर आघाडी

Tuesday, Jun 04
IMG

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

मुंबई, दि. ४ : देशातील महाउत्सव म्हणजेच लोकसभा निवडणुका पार पडल्या आहेत. आता ४ जून रोजी या लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. पहिल्या फेरीअखेर महायुती २२ तर महाविकास आघाडी २३ जागांवर आघाडीवर आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. दुपारी ३ पर्यंत मतमोजणी पूर्ण होईल, असे नियोजन करण्यात आले आहे. शिरुर मतदारसंघातून दुसऱ्या फेरीच्या अखेर अमोल कोल्हेंना 9553 मतांची आघाडी मिळाली आहे. या मतदारसंघातून अजित पवार गटाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील पिछाडीवर पडले आहेत. रायगडमधून सुनील तटकरेंनी आघाडी घेतली आहे. ठाकरे गटाचे अनंत गिते पिछाडीवर पडल्याचं चित्र दिसत आहे. नाशिकमधून ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांनी आघाडी घेतली आहे. शिंदे गटाचे हेमंत गोडसे १०००० मतांनी पिछाडीवर आहेत.  साताऱ्यामध्ये भाजपाचे उदयनराजे भोसले पिछाडीवर पडले असून शरद पवार गाटचे उमेदवार शशिकांत शिंदे आघाडीवर आहेत. बीडमधून शरद पवार गटाचे बजरंग सोनावणे आघाडीवर असून पंकजा मुंडे पिछाडीवर पडल्या आहेत. सांगलीमधून अपक्ष उमेदवार असलेले विशाल पाटील आघाडीवर असल्याचं चित्र दिसत आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून नारायण राणे 900 मतांनी पिछाडीवर आहेत. ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत आघाडीवर  असल्याचं चित्र दिसत आहे. दिंडोरीमधून भास्कर भगरे आघाडीवर असून केंद्रीय मंत्री भारती पवार पिछाडीवर पडल्याचं चित्र दिसत आहे. सोलापूरमधून प्रणिती शिंदे आघाडीवर असल्याचं चित्र दिसत आहे. महायुतीचे राम सातपुते पिछाडीवर पडले आहेत. दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. उत्तर-पूर्व मुंबई संजय दिना पाटील आघाडीवर असल्याचं चित्र दिसत आहे. दक्षिण-मध्य मुंबईतून राहुल शेवाळे आघाडीवर असल्याचं प्राथमिक कल सांगतात.  पुण्यातून भाजपाचे मुरलीधर मोहोळ आघाडीवर असल्याचं चित्र प्राथमिक कलांमध्ये दिसत आहे. कल्याणमध्येही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदे आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

Share: