IMG-LOGO
महाराष्ट्र लोकसभा

बीडमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास ज्योती मेटे इच्छुक; २९ ला घोषणा, घेतली स्वेच्छा निवृत्ती

Wednesday, Mar 27
IMG

ज्योती मेटे यांनी शासकीय नोकरीचा राजीनामा दिला असून, लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याची अधिकृत भूमिका त्यांनी आज स्पष्ट केली आहे.

बीड, दि. २७ : दिवंगत लोकनेते विनायकराव मेटे यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेऊन, मेटेंच्या पत्नी तथा शिवसंग्रामच्या सर्वसर्वा डॉ. ज्योती मेटे यांनी आपली पुढची राजकीय भूमिका जाहीर केली आहे. ज्योती मेटे यांनी अखेर लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.ज्योती मेटे यांनी शासकीय नोकरीचा राजीनामा दिला असून, लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याची अधिकृत भूमिका त्यांनी आज स्पष्ट केली आहे. तसेच याबाबत आपण लवकरच आपली भूमिका जाहीर करणार असल्याचं देखील ज्योती मेटे यांनी म्हटले आहे. त्यामुळे बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे विरुद्ध ज्योती मेटे असाच सामना रंगणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.

Share: