IMG-LOGO
विदेश

ब्राझीलच्या भीषण विमान दुर्घटनेत ६२ प्रवाशांचा जागीच मृत्यू

Saturday, Aug 10
IMG

विमानात ५८ प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते. मात्र, विमानाचा अपघात कसा झाला हे समजू शकलेले नाही.

पाउलो, दि. १० : ब्राझीलच्या साओ पाउलो राज्यातील एका शहराच्या निवासी भागात भीषण विमान दुर्घटना झाली आहे. या अपघतात ६२ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. विमान कंपनीने जारी केलेल्या निवेदनात सर्व प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. हे विमान साओ पाउलोच्या ग्वारुलोस आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी निघाले होते. निवेदनानुसार, विमानात ५८ प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते. मात्र, विमानाचा अपघात कसा झाला हे समजू शकलेले नाही. या घटनेचा व्हिडिओ देखील काहींनी मोबाइलमध्ये कैद केला आहे.

Share: