युक्रेनच्या या हल्ल्यामुळे रशियाने कुर्क भागात आणीबाणी जाहीर केली आहे.
कुर्क, दि. १० : रशिया-युक्रेन युद्ध सुरू होऊन तब्बल दोन वर्ष होत आले आहे. हे युद्ध गंभीर टप्प्यावर पोहोचले आहे. यूक्रेनने रशियावर आता पर्यंतंचा सर्वात भीषण प्रतीहल्ला केला आहे. सुमारे १००० युक्रेनियन सैनिकानी आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून थेट रशियाच्या कुर्क प्रदेशात प्रवेश केले आहे. युक्रेनच्या लष्कराने रशियाने डागलेले सर्व २७ लढाऊ ड्रोन देखील पाडले आहेत. युक्रेनच्या हवाई दलाने शुक्रवारी ही माहिती दिली. दरम्यान, युक्रेनच्या या हल्ल्यामुळे रशियाने कुर्क भागात आणीबाणी जाहीर केली आहे.