IMG-LOGO
महाराष्ट्र लोकसभा

Loksabha Election 2024 : नागपुरात महायुतीचे शक्तीप्रदर्शन; नितीन गडकरी, राजू पारवे यांनी भरला अर्ज

Wednesday, Mar 27
IMG

महायुतीच्या दोन्ही अधिकृत उमेदवारांचे निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्यात आले. दरम्यान, यावेळी महायुतीने जोरदार शक्तीप्रदर्शन केले.

नागपूर, दि. २७ : लोकसभा निवडणुक २०२४ च्या पहिल्या टप्प्यात आज नागपूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार नितीन गडकरी आणि रामटेक लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे या महायुतीच्या दोन्ही अधिकृत उमेदवारांचे निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्यात आले. दरम्यान, यावेळी महायुतीने जोरदार शक्तीप्रदर्शन केले. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, खासदार कृपाल तुमाने, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे, राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष माजी आमदार पाशा पटेल तसेच महायुतीतील सर्व पदाधिकारी आणि घटक पक्षांचे सदस्य उपस्थित होते.

Share: