IMG-LOGO
विदेश

शाश्वत विकास कसा यशस्वी होऊ शकतो, हे आम्ही दाखवले : मोदी

Monday, Sep 23
IMG

जगात तीन ठिकाणी युद्धाचा भडका उडाल्याच्या पार्श्वभूमीवर मोदींनी हे विधान केले आहे.

दिल्ली, दि. २३ : आम्ही भारतातील २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले आहे. शाश्वत विकास कसा यशस्वी होऊ शकतो, हे आम्ही दाखवून दिले आहे. यशाचा हा अनुभव जगासोबत शेअर करण्यास आम्ही तयार आहोत. मानवतेचे खरे यश आपल्या सामूहिक सामर्थ्यात, युद्धभूमीवर नाही. जागतिक शांतता आणि विकासासाठी जागतिक संस्थांमधील सुधारणा महत्त्वाच्या आहेत. जगात तीन ठिकाणी युद्धाचा भडका उडाल्याच्या पार्श्वभूमीवर मोदींनी हे विधान केले आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. क्वाड शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी ते शनिवारी (२१ सप्टेंबर) अमेरिकेत दाखल झाले. यादरम्यान त्यांनी जो बायडेन यांच्यासह अनेक देशांच्या प्रमुखांच्या भेटी घेतल्या. आज युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीच्या ७९ व्या सत्रात बोलताना पंतप्रधान मोदींनी जागतिक दहशतवाद आणि शांततेच्या मुद्द्यावर आपली महत्वपूर्ण प्रतिक्रिया दिली.   मानवतेचे यश रणांगणात नाही तर सामूहिक शक्तीत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला संबोधित करताना केले. इस्रायल-हमास युद्ध आणि युक्रेन संकटासह जगभरात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी संयुक्त राष्ट्रांच्या 'फ्युचर समिट'मध्ये हे वक्तव्य केले. शिखर परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, जेव्हा आंतरराष्ट्रीय समुदाय जगाच्या भवितव्यावर चर्चा करत असतो, तेव्हा मानवकेंद्रित दृष्टिकोनाला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे.

Share: