IMG-LOGO
विदेश

इराणच्या सर्वोच्च नेत्याकडून भारतातील मुस्लिमांबाबत वादग्रस्त टिप्पणी

Monday, Sep 16
IMG

इस्लामी उम्माचा सन्मान राखण्याचे उद्दिष्ट केवळ एकतेच्या माध्यमातूनच साध्य होऊ शकते.

दिल्ली, दि. १६  :  इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी सोमवारी भारतावर गंभीर आरोप केले. भारतात मुस्लिमांवर अत्याचार होत आहेत. पैगंबर मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी सोमवारी हे वक्तव्य केले आणि जगभरातील मुस्लिमांमध्ये एकजूट करण्याचे आवाहन केले. म्यानमार, गाझा, भारत किंवा इतर कोणत्याही ठिकाणी कोणत्याही मुस्लिमाच्या दु:खाबद्दल आपण अनभिज्ञ असू, तर आपण स्वत:ला मुसलमान समजू नये. त्यांनी भारतातील मुस्लीम अल्पसंख्याकांचा उल्लेख का केला, याचा तपशील त्यांनी दिला नाही. इस्लामच्या शत्रूंनी नेहमीच इस्लामी उम्मा (समुदाय किंवा राष्ट्र) म्हणून आमची सामायिक ओळख कमकुवत करण्याचा प्रयत्न केला आहे, असे खामेनी म्हणाले. एक्सवरील एका वेगळ्या पोस्टमध्ये त्यांनी पुन्हा गाझा आणि पॅलेस्टाईनमधील शोषित लोकांचा मुद्दा उपस्थित केला. मात्र, त्यात भारताचा उल्लेख नव्हता. इस्लामी उम्माचा सन्मान राखण्याचे उद्दिष्ट केवळ एकतेच्या माध्यमातूनच साध्य होऊ शकते, असे ते म्हणाले. आज गाझा आणि पॅलेस्टाईनमधील छळ झालेल्या लोकांना पाठिंबा देणे हे आपले कर्तव्य आहे. जो कोणी त्यापासून दूर जाईल, नक्कीच अल्लाह त्याची चौकशी करेल. 

Share: