युनूस यांच्या नेतृत्वात अंतरिम सरकार स्थापन झालं. मात्र, यानंतरही अद्याप बांगलादेशमधील परिस्थिती पूर्व स्थितीत आलेली नाही.
ढाका, दि. ११ : बांगलादेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून हिंसाचाराच्या घटना सुरु आहेत. हिंसाचाराच्या घटनानंतर शेख हसीना यांनी ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत देश सोडला. त्यानंतर बांगलादेशमध्ये नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वात अंतरिम सरकार स्थापन झालं. मात्र, यानंतरही अद्याप बांगलादेशमधील परिस्थिती पूर्व स्थितीत आलेली नाही. आता बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश ओबेदुल हसन यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.