वेळ पडली तर नरेंद्र मोदी विचार मंच स्थापन करु आणि बारामतीमधून उभं राहू, असं शिवतारे म्हणाले होते. परंतु अजित पवारांचा प्रचार करणार नाही, अशी त्यांची भूमिका होती.
बारामती, दि. ३० : लोकसभा मतदारसंघामधून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पती सुनेत्रा पवार लढणार असल्याची चर्चा असताना अजित पवारांनी उभ्या केलेल्या उमेदवाराला विरोध करण्याची भूमिका विजय शिवतारेंनी घेतली होती. अनेक आठवड्यांपासून काहीही झालं तरी अजित पवारांविरोधात लढणारच असं सांगणाऱ्या शिवतारेंनी अचानक माघार घेतली आहे.बारामतीचा सातबारा पवार कुटुंबाच्या नावावर आहे का? बारामतीत यंदा पवार विरुद्ध पवार लढाई आहे. मतदारसंघात असलेल्या साडे पाच लाख पवारविरोधी मतदारांनी काय करायचं, त्यांच्यासाठी मी निवडणूक लढवणार आहे, असं शिवतारे गेल्या २० दिवसांपासून सांगत होते. वेळ पडली तर नरेंद्र मोदी विचार मंच स्थापन करु आणि बारामतीमधून उभं राहू, असं शिवतारे म्हणाले होते. परंतु अजित पवारांचा प्रचार करणार नाही, अशी त्यांची भूमिका होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारे यांना नोटीस बजावली होती. आता बारामतीमध्ये महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार ते करणार आहेत.