IMG-LOGO
नाशिक शहर

Lok Sabha Elections 2024 Phase 5 : शांतिगिरी महाराजांवर EVM ला हार घातल्याप्रकरणी गुन्हा

Monday, May 20
IMG

त्र्यंबकेश्वर येथील मतदान केंद्रावर हा प्रकार घडला होता.

मुंबई, दि. २० : लोकसभेचे अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांना मतदान कक्षावर मशिनला हार घालणे चांगलच महागात पडलं आहे.  नाशिक लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या मैदानात असलेले अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी आज सकाळी मतदान केलं. मात्र, मतदानावेळी त्यांनी मतदान कक्षावर हार घातला. त्यांनी हार घातल्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाला. यानंतर त्यांच्यावर आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.  त्र्यंबकेश्वर येथील मतदान केंद्रावर हा प्रकार घडला होता. या प्रकरणी तहसीलदारांनी तक्रार दाखल केल्यानंतर शांतिगिरी महाराजांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जो गुन्हा आमच्यावर दाखल करण्यात आला, त्या संदर्भात आमची लीगल टीम काम पाहत आहे. आम्हाला हे आचारसंहितेचं उल्लंघन असल्याची कुठलीही कल्पना नव्हती. आम्ही ईव्हीएमला हार घातलेला नाही. ज्यांना ते चुकीचं वाटत होतं, त्यांनी तो हार त्याचवेळी काढायला हवा होता. आमच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आम्ही सुरक्षा कवचाला हार घातलेला असून आचारसंहितेचं उल्लघन होतं, याबाबत आम्हाला कल्पना नव्हती. तसेच ज्याठिकाणी पैसे वाटले जातात त्याठिकाणी गुन्हा नोंदविला जात नसल्याने त्यांनी म्हटले आहे. 

Share: