IMG-LOGO
महाराष्ट्र लोकसभा

Loksabha Election 2024 : मग भाजपचा झेंडा कुठे लावाल?, बच्चू कडू यांचा नवनीत राणा यांना सवाल

Tuesday, Apr 09
IMG

रवी राणा नेमकं कोणत्या पक्षात आहे? याच संशोधन झालं पाहिजे, त्यांचा विचार चिंतन मंथन मतदारांनी केली पाहिजे अशी टीका बच्चू कडू यांनी केली.

अमरावती , दि. ९ : मी माझ्या जीवनात कोणत्याही पक्षात जाणार नाही, अशी प्रतिक्रिया बडनेरा मतदार संघाचे आमदार रवी राणा यांनी दिली होती. यावर बच्चू कडू बोलताना म्हणाले की रवी राणा यांनी हा स्वाभिमान टिकवून ठेवला, त्यांना शाबासकी दिली पाहिजे. नवनीत राणा भाजपमध्ये गेल्यानंतरही त्यांच्या घरावर त्यांनी स्वाभिमानाचा झेंडा कायम ठेवला. मग भाजपचा झेंडा कुठे लावाल? हा संभ्रम निर्माण करणारा प्रश्न आहे. जर या निवडणुकीनंतर काँग्रेस-राष्ट्रवादी पुन्हा सत्तेत आली, ते पुन्हा राष्ट्रवादीबरोबर जातील. जिकडे सत्ता तिकडे रवी राणा, अशी ही रणनीती आहे. याचा विचार आता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाने करायला हवा”, असे ते म्हणाले. सत्तेसोबत आम्ही असलो पाहिजे अशी व्यवस्था त्यांनी केली आहे. त्यामूळे राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, काँग्रेस व मतदारांनी लक्षात घेतलं पाहिजे. एका घरात दोन पक्षाचे लोक, नवरा वेगळा आणि पत्नी वेगळी, यावर पीएच.डी. केली पाहिजे. रवी राणा नेमकं कोणत्या पक्षात आहे? याच संशोधन झालं पाहिजे, त्यांचा विचार चिंतन मंथन मतदारांनी केली पाहिजे अशी टीका बच्चू कडू यांनी केली.

Share: