IMG-LOGO
महाराष्ट्र लोकसभा

Loksabha Election 2024 : उत्तर मध्य मुंबईतून लोकसभेसाठी वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर

Friday, Apr 26
IMG

मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात पूनम महाजन विद्यमान खासदार आहेत.

मुंबई, दि. २६ : मुंबईतील उत्तर मध्य लोकसभेच्या जागेवर महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला आहे. उत्तर मध्य मुंबईची जागा काँग्रेसच्या वाट्याला आली असून पक्षाने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मुंबई उत्तर मध्य मतदारसंघावर आधीपासून काँग्रेसचा दावा होता. २०१९ च्या निवडणुकीत प्रिया दत्त यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचा २०१४ आणि २०१९ असा सलग दुसऱ्यांदा भाजपच्या पूनम महाजन यांनी पराभव केला. मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात पूनम महाजन विद्यमान खासदार आहेत. मात्र पूनम महाजन यांना पुन्हा उमेदवारी मिळणार की नाही याबाबत सस्पेन्स कायम आहे. पूनम महाजन यांनी २०१४ व २०१९ मध्ये दोन वेळा विजय मिळवला. मात्र वरिष्ठांची नाराजी, पक्षांतर्गत वाद, तक्रारी आणि सर्वेक्षण अहवाल आदी कारणांमुळे महाजन यांना उमेदवारी घोषित होऊ शकलेली नाही. मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांना वरिष्ठ नेत्यांनी उमेदवारीसाठी अनेकदा आग्रह करूनही त्यांनी आपल्याला रस नसल्याचे वरिष्ठ नेत्यांना सांगितले आहे. त्यामुळे भाजपाने अद्याप या मतदारसंघात कुणाचीही उमेदवारी जाहीर केलेली नाही.

Share: