IMG-LOGO
महाराष्ट्र लोकसभा

Lok Sabha Election 2024 Phase II : महाराष्ट्रात ११ वाजेपर्यंत सरासरी १८.८३ टक्के मतदान

Friday, Apr 26
IMG

राज्यात ११ वाजेपर्यंत सरासरी १८.८३ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

मुंबई, दि.२६ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज सकाळी ७ वाजल्यापासून सूरु झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ मतदार संघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ७.४५ टक्के मतदान झाले होते. आता ११ वाजेपर्यंत परभणीत सर्वाधिक २१.७७ टक्के मतदान झाले आहे. राज्यात सरासरी १८.८३ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. मतदान ११ वाजेपर्यंत अशी आहे मतदानाची लोकसभा मतदारसंघनिहाय आकडेवारी   परभणी - 21.77 टक्केनांदेड - 20.85 टक्केवर्धा - 18.35 टक्केहिंगोली - 18.19 टक्केयवतमाळ-वाशिम - 18.01बुलढाणा - 17.92 टक्केअमरावती - 17.73  टक्केअकोला - 17.37 टक्के

Share: