IMG-LOGO
राष्ट्रीय

एअर इंडियाचे सर्व कर्मचारी सामुदायिक रजेवर, विमानाची ७८ उड्डाण रद्द

Wednesday, May 08
IMG

प्रवाशांसाठी नि:शुल्क दुसऱ्या उड्डाणाची सोय करून दिली जाणार आहे.

मुंबई, दि. ८ : आजारपणाचं कारण देत एअर इंडियाचे कर्मचारी सामूहिक रजेवर गेले आहे. एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसचं विलिनीकरण होणार आहे. त्यामुळे आपली नोकरी धोक्यात असं असं दोन्ही एअरलाईन्सच्या वैमानिक आणि केबिन क्रूच्या भावना आहे. त्यामुळे सर्व कर्मचारी विरोध करत असून सामुदायिक रजेवर गेले आहेत. परिणामी एअर इंडिया एक्स्प्रेसची ७८ आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत उड्डाणं रद्द झाली आहेत. एअर इंडियाची जवळपास ७८  उड्डाणं रद्द करण्यात आल्यामुळं तिकीटाचे पैसे बुडाले का? असाच प्रश्न अनेक प्रवाशांना पडला. पण, कंपनीच्या वतीनं त्याबाबतची स्पष्टोक्ती देत प्रवाशांना दिलासा देण्यात आला. जी उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत त्यातील प्रवाशांना त्यांच्या तिकीटाचे पूर्ण पैसे परत करण्यात येणार असून, गरजेनुसार जी उड्डाणं रद्द झालेली नाहीत त्या प्रवाशांसाठी नि:शुल्क दुसऱ्या उड्डाणाची सोय करून दिली जाणार आहे. 

Share: