IMG-LOGO
महाराष्ट्र

EVM ची आरती करणे रुपाली चाकणकर यांना भोवले; पुणे पोलिसांकडून गुन्हा दाखल

Wednesday, May 08
IMG

निवडणूक आयोगाचं लक्ष वेधल्यानंतर स्थानिक पोलिसांना जाग आली आहे. सिंहगड रोड पोलिसांनी या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केला आहे.

पुणे, दि. ८ : चाकणकर यांनी मंगळवारी मतदानाला सुरुवात होण्याआधी खडकवासला येथील मतदारकेंद्रावर पोहचल्या. मतदानाला सुरुवात होण्याआधी त्यांनी मतदानकेंद्रात प्रवेश केला. यावेळेस त्यांच्या हातात ओवाळणीसाठीचं आरतीचं ताट आणि त्यामध्ये दिवा लावलेला होता. चाकणकर यांनी आरती केली. पण याकडे अनेकांनी निवडणूक आयोगाचं लक्ष वेधल्यानंतर स्थानिक पोलिसांना जाग आली आहे. सिंहगड रोड पोलिसांनी या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केला आहे.रुपाली चाकणकर यांनी सर्वच पक्षांचे नेते आरती करताना मतदानकेंद्रात होते असं सांगताना एक फोटो पोस्ट केला आहे. "माहिती न घेता ट्विट करणाऱ्यांसाठी... फोटोमध्ये डाव्या बाजूला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खडकवासला विभागप्रमुख भरत आबा कुंभारकर व उजव्या बाजूला राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे ओबीसीचे अध्यक्ष बाळासाहेब रायकर आहेत," अशी कॅप्शन त्यांनी फोटोला दिली आहे. निवडणूक केंद्रावर मतदान करण्यासाठी ईव्हीएम मशिन्स ठेवल्या जातात त्या ठिकाणी असलेल्या 'मार्कींग कम्पार्टमेंट'ची आरती केली. 'मार्कींग कम्पार्टमेंट' ओवाळतानाचा चाकणकर यांचा फोटो व्हायरल झाला. 

Share: