IMG-LOGO
महाराष्ट्र

कसाबची बाजू घेणाऱ्या काँग्रेसवर पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

Wednesday, May 08
IMG

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील आणि शिर्डीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी मोदी आज नगरला आले होते.

नगर, दि. ८ : मुस्लीम समाजाच्या तुष्टीकरणासाठी काँग्रेस रोज खालच्या पातळीवर जात आहे. आता काँग्रेसची पाकिस्तानातील ‘बी टीम’ही कार्यान्वित झाली आहे. मुंबईवरील २६/११च्या हल्ल्यातील अतिरेक्यांना काँग्रेसने ‘क्लीन चिट’ देऊन निर्दोषत्वाचे प्रमाणपत्रही जारी केले आहे. काँग्रेस नेत्यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या मृत्यूबाबत केलेले वक्तव्य धक्कादायक असून शहिदांचा अपमान करणारे आहे, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. ४ जूनला ‘इंडिया आघाडी’ विसर्जित होईल, असा दावाही त्यांनी केला.अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील आणि शिर्डीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी मोदी आज नगरला आले होते. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री दादा भुसे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, दोन्ही उमेदवार आणि महायुतीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.मोदी म्हणाले, येत्या चार जूननंतर त्यांचा झेंडा घ्यायलाही माणूस शिल्लक राहणार नाही. ही लढाई संतुष्टीकरण विरूद्ध तुष्टीकरण अशी आहे. आम्हाला देशातील नागिरकांना संतुष्ठ करायचे आहे तर इंडी आघाडीला त्यांच्या वोट बँकेचे तुष्टीकरण करायचे आहे. म्हणूनच काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लीम लीगशी मिळता जुळता आहे. सध्या संपूर्ण आरक्षण एस.सी. एस.टी. ओबीसी अशा घटकांना आहे. अनेक प्रयत्न करूनही हे घटक काँग्रेसला जोडले जात नाही. त्यामुळे आता काँग्रेस आघाडीने त्यांच्या आरक्षण हिसकावून घेऊन ते मुस्लिमांना देण्याचा कट रचला आहे. ज्या गोष्टीला खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विरोध केला होता, तीच गोष्ट आता ही मंडळी त्यांच्या मतबँकेसाठी करीत आहेत, त्यासाठी त्यांना राज्य घटना बदलायची आहे. त्यांना लोकांनी नाकारले आहे.

Share: