IMG-LOGO
राष्ट्रीय

Chhattisgarh Bus Accident : बस ५० फूट खाणीत कोसळून भीषण अपघात, १५ मजुरांचा मृत्यू

Wednesday, Apr 10
IMG

छत्तीसगडच्या रायपूर-दुर्ग मार्गावर हा अपघात झाला. मंगळवारी रात्री ५० कर्मचारी ज्या बसमध्ये बसले होते

दुर्ग, दि. १० : जिल्ह्यात मंगळवारी (दि. ९) रात्री घडलेल्या घटनेनं छत्तीसगड हादरलं आहे. एक बस खाणीत कोसळल्याने १५ जणांना जीव गमवावा लागला आहे. याशिवाय २० हून अधिक जण जखमी झाले आहेत. सायंकाळी उशिरा एक बस या खाणीत कोसळली. त्यात बसलेल्या १५ कामगारांचा मृत्यू झाला. बसमध्ये ४० हून अधिक लोक होते. हे सर्व लोक जवळच असलेल्या डिस्टिलरी प्लांटमध्ये काम करायचे. छत्तीसगडच्या रायपूर-दुर्ग मार्गावर हा अपघात झाला. मंगळवारी रात्री ५० कर्मचारी ज्या बसमध्ये बसले होते त्या बसचा अपघात झाला. या अपघातात १५  मजूर ठार झाले. तर २० हून अधिकजण जखमी झाले. या सगळ्यांवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी १० जणांची प्रकृती गंभीर आहे अशी माहितीही समोर येते आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत या दुर्घटनेवर शोक व्यक्त केलं आहे. पंतप्रधान मोदींनी एक्स मीडियावर ट्वीट करत लिहिलं आहे की, छत्तीसगडच्या दुर्गमधील बस दुर्घटना अत्यंत दुःखद आहे. यामध्ये ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्याबद्दल माझ्या संवेदना. जखमींची प्रकृती लवकरात लवकर बरी होवो अशी, अशा सदिच्छा व्यक्त करतो. राज्य सरकारच्या देखरेखीखाली स्थानिक प्रशासन दुर्घटनेतील पीडितांना सर्वतोपरी मदत करत आहे.

Share: