उमेदवारांची ९ एप्रिल २०२४ रोजी मुलाखत झाली होती. त्यानंतर आज अंतिम निकाल जाहीर झाले.
दिल्ली, दि. १६ : युपीएससी परीक्षेचा अंतिम निकाल आज मंगळवारी जाहीर झाला आहे. आदित्य श्रीवास्तव याने या परीक्षेत देशात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. आदित्य श्रीवास्तव देशात पहिला तर अनिमेश प्रधान देशात दुसरा आला आहे. यंदा मात्र मुलांनी बाजी मारली आहे. देशात तिसऱ्या क्रमांकावर डोनुरू अनन्या रेड्डी आहे. २०२३मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षांचे हे निकाल आहे.युपीएससीने वेबसाईटवर /upsc.gov.in/ हा निकाल जाहीर केला आहे. पहिल्या १०० जणांमध्ये महाराष्ट्रातील अनिकेत हिरडे ८१ व्या स्थानावर आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने २०२३ मध्ये १ हजार १४३ पदांसाठी जाहीरात प्रसिद्ध केली होती. पूर्व आणि मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची ९ एप्रिल २०२४ रोजी मुलाखत झाली होती. त्यानंतर आज अंतिम निकाल जाहीर झाले.