१०२ मतदारसंघात एकूण १६०५ उमेदवार मैदानात आहेत. त्यामध्ये १४९१ पुरुष तर १३४ महिला उमेदवार आहेत.
मुंबई, दि. १९ : लोकसभा निवडणुकीला आज (दि. १९) सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात देशातील १९ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण १०२ लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान चालू आहे.१०२ मतदारसंघात एकूण १६०५ उमेदवार मैदानात आहेत. त्यामध्ये १४९१ पुरुष तर १३४ महिला उमेदवार आहेत. पहिल्या टप्प्यात ८ केंद्रीय मंत्री, २ माजी मुख्यमंत्री आणि एक माजी राज्यपाल निवडणुकीच्या रिंगणात आहेत.गेल्या लोकसभा निवडणुकीत या १०२ मतदारसंघापैकी ४५ जागा यूपीएनं तर ४१ एनडीएनं जिंकल्या होत्या. लोकसभेच्या पहिल्या टप्प्यासह अरुणाचल प्रदेशमधील (६०) आणि सिक्कीममधील ३२ विधानसभा मतदारसंघातही विधानसभा निवडणूक होत आहे.