IMG-LOGO
लोकसभा २०२४

Loksabha Election 2024 : ‘इंडिया’ आघाडी ही विकास विरोधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी

Thursday, Apr 11
IMG

संविधान एवढे महत्त्वाचे होते, ते संविधान पूर्ण हिंदुस्थानमध्ये लागू करण्याचे धाडस का केले नाही.

नागपूर, दि. ११ : पूर्व विदर्भाला सुजलाम-सुफलाम करणारा गोसेखुर्द सिंचन प्रकल्प काँग्रेसमुळे रखडला. केंद्र व राज्यातील महायुतीच्या सरकारने त्याला निधी दिला, असा आरोप करत ‘इंडिया’ आघाडी ही विकास विरोधी आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केली. महाराष्ट्रातून या आघाडीचा एकही उमेदवार निवडून देऊ नका, असे आवाहन त्यांनी कन्हान येथे झालेल्या जाहीर सभेत केले. पंतप्रधान पुढे म्हणाले की, आपले एक एक मत यांनी जिंकवण्यासाठी तर आहेच, मात्र त्यांनी शिक्षा देण्यासाठीही आहे. काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांचे राजकारण संपवले. बाबासाहेबांना भारतरत्न पुरस्कारापासून वंचित ठेवले. संविधान एवढे महत्त्वाचे होते, ते संविधान पूर्ण हिंदुस्थानमध्ये लागू करण्याचे धाडस का केले नाही. ७०-७५ वर्षे बाबासाहेबांचे संविधान भारतात लागू झाले नव्हते. याला कोण जबाबदार आहे ? काँग्रेसने दहशतवाद आणि फुटीरतावादाला खत-पाणी देणारे ३७० चालू ठेवले. परिवारवादी पक्षांनी संविधानाच्या भावनेचा अपमान केला. हे स्वतःच्या परिवाराला पुढे नेण्यात व्यस्त आहेत. यावेळी व्यासपीठावर केंद्रीयमंत्री व नागपूचे भाजप उमेदवार नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदी उपस्थित होते. भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द सिंचन प्रकल्पाचे उदाहरण दिले. काँग्रेसच्या काळात अनेक वर्ष हा प्रकल्प निधी अभावी रखडला होता. केंद्रात व महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने या प्रकल्पासाठी घसघशीत मदत केली. त्यामुळे पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळाला, असे मोदी म्हणाले. 

Share: