IMG-LOGO
लोकसभा २०२४

Loksabha Elections 2024 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स | ९ एप्रिल २०२४

Tuesday, Apr 09
IMG

Loksabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकींचे लाइव्ह अपडेट्स, ताज्या घडामोडी एका क्लिकवर उपलब्ध

व्यभिचाराला राजमान्यता देऊ नका असं म्हणत राज ठाकरेंच्या मनसेचा महायुतीला पाठिंबादिल्लीत अमित शहांच्या भेटीनंतर मनसे महायुतीत सामील होत असल्याची चर्चा सुरू होती. त्यावर आज शिक्कामोर्तब झाले आहे. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आपणा महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याची घोषणा राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यातून केली आहे. ------नगरमध्ये मांजरीला वाचवताना ६ जण बायोगॅसच्या २०० फूट खोल खड्ड्यात बुडालेनगरमध्ये एका मांजरीला वाचवण्याच्या प्रयत्नात ६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. बायोगॅसच्या खड्ड्यामध्ये पडलेल्या मांजरीला वाचवताना ६ जण बुडाल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यामधील वाकडी गावात घडली आहे. माणिक गोविंद काळे,  संदीप माणिक काळे, बबलू अनिल काळे, अनिल बापूराव काळे,  बाबासाहेब गायकवाड अशी त्यांची नावे असून एकाचे नाव समजू शकलेले नाही. (biogas plant nagar)  ------सई ताम्हणकरने खरेदी केली नवी आलिशान गाडीसईने मराठी नवीन वर्षात एक नवी आलिशान गाडी खरेदी केलीआहे. तिने गाडी खरेदी करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. मर्सिडीज बेंझ ही नवी कोरी गाडी गुढी पाडव्याच्या शुभदिनी सई घरी घेऊन आली आहे.------

Share: