IMG-LOGO
लोकसभा २०२४

Loksabha Election 2024 : राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून तिसरी यादी जाहीर; साताऱ्यातून शशिकांत शिंदे यांना उमेदवारी

Wednesday, Apr 10
IMG

आता केवळ माढा लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार घोषित करणे बाकी आहे.

मुंबई, दि. १० : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तिसरी लोकसभा उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये सातारा आणि रावेर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. साताऱ्यातून शशिकांत शिंदे तर रावेरमधून श्रीराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आता केवळ माढा लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार घोषित करणे बाकी आहे. https://x.com/NCPspeaks/status/1777906316817887474आतापर्यंत घोषित झालेले नावे  बारामती : सुप्रिया सुळे, शिरूर : अमोल कोल्हे, अहमदनगर : नीलेश लंके, दिंडोरी :  भास्करराव भगरे, वर्धा : अमर काळे, बीड : बजरंग सोनावणे, भिवंडी : सुरेश म्हात्रे, सातारा : शशिकांत शिंदे, रावेर : श्रीराम पाटील.

Share: